Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident Live Updates : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री

ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 जणांचा मृत्यू झालाय.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Aug 2023 12:59 PM

पार्श्वभूमी

Samruddhi Mahamarg Thane accident Live Updates : ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये...More

नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लॉन्च करणाऱ्या VSL कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident : नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लॉन्च करणाऱ्या व्ही एस एल कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.