Ramdas Athawale Statement On Hooch : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी भिवंडी दौऱ्यावर असताना त्यांनी हातभट्टीच्या दारूबाबत (Country Liquor) अजब मागणी केली आहे. सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरिबांचे जीव वाचतील, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. हे आपलं वैयक्तित मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Continues below advertisement

Hooch Legalization Logic : काय आहे रामदास आठवलेंचा तर्क?

पुणे येथे नुकतीच विषारी दारू प्यायल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "हातावर पोट असणारा मजूर आणि कामगार वर्ग प्रामुख्याने स्वस्त असणारी हातभट्टीची दारू पितो. माझं वैयक्तिक मत असं आहे की, सरकारने हातभट्टीची दारू अधिकृत करावी. यामुळे ही दारू सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणाऱ्या दरात मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यावर शासनाचे कायदेशीर नियंत्रण राहील, ज्यामुळे विषबाधेसारख्या घटना टळतील. यातून शासनाला मोठा महसूलही मिळेल आणि गोरगरीब मजुरांचे जीवही वाचतील."

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणावर काय म्हणाले? 

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर आणि मराठा आरक्षणावर बोलताना आठवले म्हणाले की, "आरपीआय पक्षाचा मराठा आरक्षणाला सुरुवातीपासूनच जाहीर पाठिंबा आहे. विदर्भातील कुणबी मराठा समाजाला आधीच आरक्षण आहे. मराठा समाजही कुणबी समाजाप्रमाणेच शेती करतो, त्यामुळे ज्यांच्या जुन्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत, त्यांना ओबीसी दाखला नक्की द्यावा. मात्र, सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही."

Continues below advertisement

मराठा समाजाला आरक्षण देताना मूळ ओबीसींवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे मराठा समाजाचा समावेश 10 टक्के ईडब्ल्यूएस (EWS) गटामध्ये करून त्या माध्यमातून आरक्षण देता येऊ शकते. आगामी जनगणनेनंतर सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल, परंतु तोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावा, अशी आमची भूमिका आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

SC ST Sub Categorization : जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर राज्य शासनाकडून अनुसूचित जाती-जमातींच्या उपवर्गीकरणाची (Sub-Categorization) अंमलबजावणी सुरू झाली आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, "आता देशात जनगणना होत आहे, ज्यातून सर्व समाजाची खरी आकडेवारी समोर येईल. त्यामुळे कोणत्याही जातीवर अन्याय न करता, ज्याची जेवढी लोकसंख्या, तेवढे त्याला आरक्षण (Proportional Reservation) या तत्त्वाने आरक्षण मिळालं पाहिजे."

मातंग समाजाच्या मनात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे, हे मान्य करत ते पुढे म्हणाले की, देशात जातीव्यवस्था कायद्याने संपली असली तरी लोकांच्या मनातून ती अद्याप गेलेली नाही. आजही खेड्यापाड्यात दलितांवर अन्याय होत आहेत. ज्या दिवशी मनातून ही जातीव्यवस्था पूर्णपणे नष्ट होईल, त्या दिवशी आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत.

RPI Party Expansion Advice : पक्ष मोठा करण्यासाठी सर्व समाजाला सोबत घ्या

पक्ष कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला देताना रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. दलित पँथरनंतर बाबासाहेबांचा हा पक्ष मी देशभर पसरवला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाची शाखा केवळ एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित ठेवू नये. केवळ एका समाजाच्या मतांवर कोणालाही सत्ता स्थापन करता येत नाही. पक्ष मोठा करायचा असेल तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना न्याय देणे गरजेचे आहे, तरच पक्षाचा विस्तार होईल.

ही बातमी वाचा: