Jitendra Awhad on Religious Conversion:  गाझियाबादमधील कथित धर्मांतर केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहे. 'मुंब्र्याला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे', असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केला आहे. 'तसेच महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे', असं देखील आव्हाडांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आहेत.


गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेम्सद्वारे कथित धर्मांतर (Religious Conversion) केल्याच्या आरोपाखाली मुंब्र्यातील शहानवाज या आरोपीला ठाणे पोलिसांनी अलिबागमधून अटक केली. तसेच शहानवाज हा सध्या गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात आहे. गाझियाबाद पोलिसांनी मुंब्र्यातील 400 मुलांचं धर्मांतर झाल्याची माहिती दिली होती. यावर जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी  सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं.  'धर्मांतराच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि पोलीस शांत का?' असा सवाल देखील आव्हाडांनी उपस्थित केला आहे. 


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 'मुंब्र्यातील वातावरण खराब करुन तिथल्या मुलांवर संशय निर्माण केला जात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर केला आहे. 'मुंब्र्यातील आमदार मीच असल्याने तिथलं वातावरण बिघडवल्यास सरकारला आणखी आनंद होईल', असं देखील यावेळी जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 'जर गाझियाबादमधील पोलीस मुंब्र्यातील 400 लोकं धर्मांतरित झाल्याचं म्हणत असतील तर मुंब्रा पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं', 'जर 400 मुलं धर्मांतरित झाली असतील तर मुंब्रा पोलिसांना समजलं कसं नाही?' असा सवाल देखील जितेंद्र आव्हाडांनी यावेळी उपस्थित केला आहे. 


हिंदू समाजावर अविश्वास दाखवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आव्हाडांनी केला. तसेच 'पोलिसांना नीट बातमीच कळत नाही, यामुळे हिंदू समाज आणि पोलिस देखील बदनाम होत आहेत, मुसलमानांकडे देखील संशयाच्या नजरेने पाहिलं जातं', असं देखील आव्हाडांनी म्हटलं. 'मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या जिल्ल्ह्यात असं काही घडलं नाही हे सांगायला हवं, कारण हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे', असं म्हणत आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 'राजकीय हितासाठी हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम सुरु आहे', असं म्हणत आव्हाडांनी सरकारवर थेट आरोप केले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Supriya Sule : शिंदे-फडणवीस सरकारची Anniversary, 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंची मिश्किल टीका