मुंबई: राज्यात कायदा सुव्यवस्थेचे ठेकेदार असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याला बिहारच्या वाटेवर घेऊन निघाले आहेत, मीरा भाईंदर येथील गरीब मुस्लिम समाजावर बुलडोझर चालवणारे पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराच्या (Ganpat Gaikwad) घरावर बुलडोझर चालवणार का असा सवाल एआयएमआयएम (MIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफार कादरी कार्याध्यक्ष यांनी केला आहे. ते भिवंडीत लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले होके.


जशी अजित पवारांनी क्लीन चिट दिली तशीच आता  गोळीबार करणाऱ्याभाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनाही क्लीन चीट दिली जाईल अशी टीका एमआयएमने केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आईचे दूध पिले असेल असेल तर आमदार गणपत गायकवाड यांच्या घरावर बुलडोझर चालवून दाखवावा असं आव्हानही त्यांनी दिलंय. 


एमआयएम लोकसभेच्या पाच जागा लढवणार


महाराष्ट्रात एमआयएम पक्ष उत्तरमध्य मुंबई, धुळे मालेगाव,नांदेड ,भिवंडी व संभाजीनगर या पाच लोकसभा जागा लढवण्याचा विचार करत असून त्या दृष्टीने मतदारसंघाचे सर्वेक्षण सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून वंचित दलित अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी भाजपला पराभूत करण्याचा इरादा एमआयएम पक्षाचा आहे. परंतु धर्मनिरपेक्ष मतांचे ठेकेदार समजणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे एमआयएम पक्षाला अछूत समजत असल्याने इंडिया आघाडीने एमआयएम पक्षाला आमंत्रित केले नाही. त्यांच्यामध्येसुद्धा  काही आलबेल नाही, इंडिया आघाडीचा सर्वात मोठा ठेकेदार नितीशकुमार फरार झाला असा घणाघात 
डॉ. अब्दुल गफार कादरी यांनी केला आहे.


काय आहे प्रकरण? 


भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. शुक्रवारी हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. 


मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. याचा मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं, त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो, पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं असल्याचं गणपत गायकवाड म्हणाले.


दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा: