Continues below advertisement

मुंबई : म्हाडाने ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई परिसरासाठी तब्बल 5362 घरे आणि भूखंडांसाठी लॉटरी काढली आहे. सर्वसामान्यांसाठी ही मोठी संधी असून अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या लॉटरीतील सर्वाधिक घरे ही कल्याणमध्ये असून त्याची एकूण संख्या ही 3,641 इतकी आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या किमती या 9 लाखांपासून सुरू होत असून 35 लाखांपर्यंत आहेत.

म्हाडाने कल्याणमध्ये कोणत्या भागासाठी आणि किती किमतीमध्ये घरे उपलब्ध करुन दिली आहेत याची माहिती सविस्तरपणे घेऊयात,

Continues below advertisement

1. मॅक्रो टेक डेव्हलपर्स, घारीवली, कल्याण (लोढा डेव्हलपर्स)

अल्प उत्पन्न गटासाठी

एकूण घरे - 2429

क्षेत्रफळ - 495 स्क्वेअर फूट

किंमत - 21,37,770 ते 21,98,200 रुपये

2. होराईझन प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड, उमरसर सांडप , ठाणे (रुनवाल डेव्हलपर्स)

अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी

एकूण घरे - 432 आणि 141 (एकू्ण - 571)

किंमत - अल्प उत्पन्न - 19,03,300 ते 19,13,800

अत्यल्प उत्पन्न - 13,40,500 रुपये

3. धारवानी प्रॉपर्टी, कल्याण

अल्प उत्पन्न

एकूण घरे - 6

किंमत - 22,41,000 किंमत

4. शिरढोण

अल्प उत्पन्न गट

एकूण घरे - 525

किंमत - 35,66,689

5. अभिदर्शन कॉर्पोरेशन, एल एल पी , टिटवाळा कल्याण

अत्यल्प उत्पन्न गट

एकूण घरे - 56

किंमत - 19,60,900 ते 19,95,400

6. सिझन सहारा, आडीवली, पिसवली , कल्याण

अल्प उत्पन्न गट

एकूण घरे- 37

किंमत - 18,90,600 ते 25,75,100

7. गौरी विनायक बिल्डर्स तिसगाव , कल्याण

अत्यल्प उत्पन्न गट

एकूण घरे- 7

किंमत - 9,55,800 ते 11,32,100

सोडतीचे वेळापत्रक

1) सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व दस्तऐवती सुरुवात :

15/07/2024 रोजी सकाळी 9:00 वा. पासून

2) ऑनलाईन अर्ज पेमेंट स्वीकारणी सुरुवात :

16/07/2024 रोजी सकाळी 10:30 वा. पासून

3) ऑनलाईन अर्जासाठी लॉटरीची शेवटची तारीख व वेळ :

29/07/2024 रोजी रात्री 11:59 वा. पर्यंत

4) ऑनलाईनद्वारे शुल्क स्वीकारणीची शेवटची दिनांक व वेळ :

30/07/2024 रोजी रात्री 11:59 वा. पर्यंत

5) सोडतीसाठी स्वीकार झालेल्या अर्जांची प्रारंभिक यादी प्रसिद्धी :

29/07/2024 रोजी संध्याकाळी 6:00 वा. पर्यंत

6) हरकती व तक्रारी निवारणासाठी ऑनलाईन लिंकद्वारे अंतिम दिनांक व वेळ :

31/07/2024 रोजी संध्याकाळी 6:00 वा. पर्यंत

7) सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी प्रसिद्धी :

01/08/2024 रोजी सकाळी 10:00 वा.

8) सोडतीचा दिनांक व वेळ :

02/08/2024 रोजी सकाळी 10:00 वा.

9) सोडतीचे ठिकाण :

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे

10) सोडतीनंतर यशस्वी अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध :

02/08/2024 रोजी संध्याकाळी 6:00 वा. पर्यंत

अर्ज कुठे कराल?

म्हाडाच्या या घरांसाठी 15 जुलै रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठीची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट आहे. म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

ही बातमी वाचा: