ठाणे : आपल्याला काही चमचमीत खायचं असलं की, आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो. पण, प्रत्येक बाहेरून छान दिसणाऱ्या हॉटेलमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जातेच असं नाही. याची वारंवार काही उदाहरण समोर आली आहेत, ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या जीवाशी कसा खेळ करतात हे दिसून आलं आहे. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध पाव भाजी हॉटेलमधील एक किळसवाणा व्हिडीओ (Rat was found on Bread) व्हायरल झाला आहे. पावांच्या पिशवीवर उंदीर फिरत असल्याचं दृश्य या व्हिडीओमध्ये दिसत आहे.


ठाण्याच्या प्रसिद्ध पावभाजी हॉटेलमधील किळसवाणा प्रकार! 


अनेक वेळा हॉटेल आणि ढाबा यांसारख्या ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा झाल्याचं समोर येतो. असाचा काहीसा किळसवाणा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ठाण्यात एका प्रसिद्ध पाव भाजीच्या हॉटेलमधील गलिच्छपणा दाखवणारा व्हिडीओ वायरल झाला आहे. या हॉटेलमध्ये पावांच्या पिशवीमध्ये चक्क उंदीर शिरला असून तो पावाचे तुकडे तोडून खात आसल्याचं दिसून येत आहे. 


पावांवर ताव मारणाऱ्या उंदराचा व्हिडीओ व्हायरल


उंदीर मामा खुशाल पावाच्या पिशवीमध्ये शिरुन पाव खात असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराचा कुठलाही थांगपत्ता  हॉटेल चालकाला अथवा कामगारांना नव्हता. अशा गलिच्छ प्रकारे कुठलीही स्वच्छतेची काळजी न घेता ग्राहकांच्या माथी खाद्यपदार्थ मारत असल्याबद्दल संताप व्यक्त होत असतानाच आता यावर अन्न आणि औषध प्रशासन काय कारवाई करणार हे बघावं लागणार आहे.


अनेक वेळा लोकांचा असा समज असतो की, चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याचा तिथे चांगले पदार्थ खायला मिळतील आणि तिथे स्वच्छतेचीही चांगली काळजी घेतली जाते. यामुळे अनेक जण स्ट्रीट फूड किंवा छोट्या स्टॉलपेक्षा चांगल्या हॉटेलमध्ये जाणं पसंत करतात. पण, अलिकडच्या काळात काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये हॉटेलमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत गांभीर्य नसल्याचं दिसून आलं आहे. 


याचाच अर्थ, असा की जास्त किंमत मोजल्यावर तुम्हांला सुरक्षित अन्न मिळेल याची कोणतीही हमी नाही, असंच म्हणालं लागेल. आता या प्रकरणी हॉटेलविरोधात अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करणार का आणि केल्यास नेमकी कोणती हे पाहावं लागणार आहे.


संबंधित इतर बातम्या :


किळसवाणा प्रकार! ढाब्यावरील जेवणात आढळला मेलेला उंदीर; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त