karjat yard railway station : कर्जत स्थानकावर बूम पोर्टलच्या उभारणीसाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक शनिवार आणि रविवारी असेल. यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जतमधून प्रवास करताना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं. सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस असल्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. लोकल सेवा इतर दिवसांप्रमाणेच धावतील.
शनिवार 03.12.2022 रोजी ब्लॉक 1 - सकाळी 10.45 ते दुपारी 12.15 (90 मिनिटे) भिवपुरी रोड ते पळसधरीपर्यंत सर्व मार्गावर
उपनगरीय गाड्यांच्या चालण्याच्या पद्धती
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09.01, 09.30 आणि 09.57 वाजता सुटणाऱ्या कर्जत लोकल नेरळपर्यंत धावतील.
कर्जत येथून सकाळी 10.45 , 111.19, दुपारी 12.00 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात येतील.
कर्जत येथून सकाळी 10.40 आणि दुपारी 12.00 वाजता सुटणारी खोपोली लोकल रद्द राहणार आहे.
खोपोली येथून सकाळी 11.20 आणि दुपारी 12.40 वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहणार आहे.
खालील एक्सप्रेस गाड्या लोणावळा, पळसधरी येथे नियमित केल्या जातील आणि गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा उशिराने पोहोचतील
ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद - मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 16587 यशवंतपूर - बिकानेर एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
रविवार 04.12.2022 रोजी ब्लॉक 2 - 11.20 ते दुपारी 12.20 वाजेपर्यंत भिवपुरी रोड ते पळसधरी पर्यंत सर्व मार्गांवर
उपनगरीय गाड्यांच्या चालण्याच्या पद्धती
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09.30 आणि 09.57 वाजता सुटणाऱ्या कर्जत लोकल नेरळपर्यंत चालविण्यात येतील.
कर्जत येथून सकाळी 11.19 आणि दुपारी 12.00 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात येतील.
कर्जत येथून दुपारी 12.00 वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि खोपोली येथून सकाळी 11.20 वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहतील.
11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस रविवारी नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल. ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यान कोणतीही उपनगरी सेवा उपलब्ध असणार नाही. या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.