Kalyan School wall collapses : कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून (KalyanSchoolwallcollapses) मोठी दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अन्य काही लहान मुलं जखमी झाले आहेत. कल्याणमधील केबीके इंटरनॅशनल स्कूलची ही भिंत आहे. यामध्ये दोन मुलं जखमी (KalyanSchoolwallcollapses) झाल्याची माहिती समोर आली आहे.  अंश राजकुमार सिंह (वय 11)असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. 

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

अधिकची माहिती अशी की, कल्याण बाल्यांनी केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर दोन लहान मुले जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. शाळेजवळ मुलं खेळत असताना अचानक भिंत कोसळली. 

शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना

शाळेजवळ काही लहान मुलं खेळत होती. याचवेळी अचानक केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळली आहे. यावेळी तेथेच खेळत असलेल्या अंश कुमार सिंह याचा मृत्यू झाला तर सोहेब शेख (वय 6) आणि अभिषेक सहानी (वय 10) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. वारंवार शाळेकडे स्थानिकांनी भिंत दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. मात्र मुजोर शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केल्याने आज मोठी दुर्घटना घडली. शाळेची भिंत कोसळल्याने दोन मुल गंभीर जखमी झाले असून एकाचा यात मृत्यू झाला आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dhananjay Munde Vipassana: धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात; पंकजा मुंडे म्हणाल्या, योग्य पर्याय निवडला!

Manikrao Kokate: ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंची वक्तव्यावर सारवासारव; म्हणाले, 'तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढलात...'