ठाणे :महाराष्ट्रातील पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान उतारावरून नियंत्रण सुटलेली मालगाडी धावल्याने मोठा अनर्थ घडला असता. मात्र सुदैवाने असे काही झाले नाही. या घटनेनंतर मध्य रेल्वेकडून तपास सुरु करणयात आल्याची माहिती समोर आली आहे. 

पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानकात तीन इंजिन असलेली मालवाहतूक करणारी रेल्वेगाडी प्रचंड वेगात धावत असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर मध्य रेल्वेने तपास सुरू केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मालगाडी मालवाहतूक करत होती आणि ती उतारावरून अचानक धावू लागली. या घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले. यानंतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. 

प्राथमिक माहितीनुसार, मालवाहतूक करणारी रेल्वेगाडी चालवणाऱ्यांमध्ये प्रशिक्षणार्थी लोको पायलट्सचाही समावेश होता आणि गाडी उतारावर जात असताना ते तिला योग्य प्रकारे नियंत्रणात ठेवू शकले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. 

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, या प्रकरणाचे नेमके कारण आणि त्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी सविस्तर चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ :