Continues below advertisement

ठाणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत (Dombivli Youth Suicide) घडली. डोंबिवली पश्चिम भागातील सुदामा इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. ऋषिकेश परब असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो इमारतीवरून उडी मारतानाची घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे.

प्रेमप्रकरणात अपयश आल्यानंतर या तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिस अधिकचा तपास करत आहेत. अकराव्या मजल्यावरून हा तरुण उडी मारून जीव देतानाचा प्रसंग एका मोबाईलच्या कॅमेरात कैद झाल्याचं दिसतंय.

Continues below advertisement

Dombivli Youth Suicide : वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी

सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत या नाट्यमय आत्महत्येचा प्रयत्न सुरू होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाला आत्महत्या करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. अखेर या तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

Dombivli Crime News : प्रेयसीसोबत वाद झाल्याची माहिती

मृतक ऋषिकेश परब हा डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर, भागातील सुदामा इमारतीमध्ये सहा मजल्यावर कुटुंबासह राहत होता. तो डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीशी ओळख झाली. कालांतरानं दोघामध्ये प्रेमाचं सूत जुळले. काही महिन्यांनंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. असाच वाद शनिवारीही झाल्याची माहिती आहे. नंतर ऋषिकेशने मोबाईल घरात फेकून दिला आणि तडक अकराव्या मजल्यावरील डकमध्ये जाऊन बसला. सकाळी 8 वाजल्यापासून तो त्या ठिकाणी बसून होता.

सकाळी 11.50 वाजता घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर काही वेळातच, 12 वाजता ऋषिकेशने उडी घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.

अग्निशमन दलाचा प्रयत्न असफल

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न फोल ठरला. तर दुसरीकडे प्रेयसीशी सोबत प्रेम प्रकरणातून झालेल्य वादातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे डोंबिवली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा: