Diwali 2022 : एकीकडे राज्य सरकारकडून १०० रुपयात दिवाळी फराळ साहित्य दिलं जात असतानाच अंबरनाथमध्ये (Ambernath) बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून अवघ्या १० रुपयात दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आलं. अंबरनाथमधील (Ambernath) जवळपास साडेतीन हजार गरजू नागरिकांना हे साहित्य वाटण्यात आलं.
अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्याला आहे. या कामगार वर्गाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आलं. यामध्ये एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो साखर, एक किलो पाम तेल, एक किलो जाड पोहे, अर्धा किलो चणा डाळ, पाव किलो फुटाणे, पाव किलो शेंगदाणे, ५० ग्रॅम चिवडा मसाला असं जवळपास साडेचारशे रुपयांचं साहित्य फक्त १० रुपयांमध्ये देण्यात आलं. यासाठी नागरिकांना आधीच कुपन वाटण्यात आले होते. उपलब्ध आकडेवारीनुसार जवळपास साडेतीन हजार नागरिकांना हे किट्स वाटण्यात आले. यासाठी खुंटवली परिसरातील गावदेवी मंदिराच्या बाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. गेल्या बारा वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा हा प्रयत्न आमच्याकडून केला जात असून यावर्षीही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सुरू ठेवल्याचं यावेळी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितलं.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी बुवापाडा, भास्कर नगर, भेंडी पाडा, मेठल नगर, दुबई गल्ली, खुंटवली, गावदेवी, घाडगे नगर च्या राहिवाशियानी मोठी गर्दी केली होती. या परिसरातील नागरिक हे मोल मजुरी करणारे असून रोजनदारी वर काम करतात, आणि म्हणूनच यांची ही दिवाळी चांगली व्हावी या उद्देशाने हा साधारणपणे पाच शे चा फराळाचा किट नाममात्र 10 रुपयात देतात. हा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून अविरत पाने सुरू आहे, आणि पुढे ही सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी वालेकरांनी दिली. या कार्यक्रमावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर हे देखील उपस्थित होते. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील यावेळी मोठी उपस्थिती लावली होती.
आणखी वाचा : ST Fare Hike : एसटी प्रवासात आजपासून 5 ते 75 रुपयांची हंगामी भाडेवाढ लागू, प्रवाशांना आर्थिक झळ