Shrikant Shinde: राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपमान करत ट्विट केल्याप्रकरणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या होत्या. याप्रकरणी अखेर चार पोलीस ठाण्यात आनंद परांजपे  विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. याबाबत बोलताना आनंद परस्परांनी तीव्र नाराजी व्यक्त करत खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकांच्या भावना आहेत, त्या त्या ठिकाणी जावून व्यक्त केल्या आहेत. आपण जेव्हा काही म्हणतो त्या गोष्टी विचारपूर्वक बोलल्या पाहिजेत. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण काही बोलू शकतो पण आपण कोणाबद्दल बोलतोय? कशाबद्दल बोलतोय? कशी भाषा वापरतोय? याचंही भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. भान ठेवलं तर लोकांच्या भावनांचा उद्रेक होणार नाही, असा टोला परांजपे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे .


रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही - खासदार श्रीकांत शिंदे


डोंबिवलीतील १२ रस्त्यांचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीत  पुढील पावसाळ्यापर्यंत जास्तीत जास्त रस्ते कोंक्रीटचे होतील..एम आय डी सी मध्ये एकाच प्रभागात १०० कोटींचे निधी दिलाय.. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करतय .रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सहन देखील जाणार नाही ..हे रस्ते आहेत त्यासाठी लोक अनेक वर्ष वाट पाहत होते आणि आता ते रस्ते होत आहेत असे सांगितले ..


कल्याण शीळ रोड नागपूरच्या धर्तीवर डबल डेकर करणार : श्रीकांत शिंदे यांची माहिती
वाढती लोकसंख्या पाहता येत्या काळात नागपूरच्या धर्तीवर  कल्याण शीळ रोड  डबल डेकर करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण शीळ रोड पूर्ण रस्ता काँक्रिट केला आहे मात्र वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात हा देखील रस्ता कमी पडणार आहे.. या उद्देशाने मुख्यमंत्र्यांना नागपूरला जसं डबल डेकर रस्ता केला आहे  म्हणजेच खाली रस्ता त्यावर फ्लायओव्हर  त्यावर मेट्रो केला आहे तसेच कल्याण शीळ रोड वर देखील करा अशी मागणी केली आहे .कल्याणची मेट्रोही तळोजापर्यंत जाणार आहे... ती जर या ब्रिज बरोबर एकत्र केली तर या ठिकाणी मेट्रोला ही पर्याय होईल त्याचबरोबर शिळफाटा ते रांजनोली पूर्ण रस्ता असेल ज्या ठिकाणी भविष्यात कल्याण डोंबिवलीकरांना ट्रॅफिकचे समस्यांमध्ये जावा लागणार नाही या दृष्टिकोनातून पुढचा वीस वर्षाचा विचार करून हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे असे सांगितले