Badlapur News: बदलापूर एमआयडीसी (Badlapur Midc) क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांनी त्यांचं केमिकलचे सांडपाणी (Chemical water) थेट उल्हास नदीत (Ulhas River) सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. या भागातील कारखानदारांनी थेट उल्हास नदीत सांडपाणी सोडण्याचा प्रताप समोर आला आहे. मात्र, याकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.


कारखानदारांना पाईपलाईनद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवणे बंधनकारक


गेल्या दोन दिवसापासून बदलापुरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही बदलापुरात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.  या पावसाच्या पाण्यासोबतच एमआयडीसीचे सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडण्याचा प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील रासायनिक कारखानदारांना त्यांचे सांडपाणी पाईपलाईनद्वारे प्रक्रिया केंद्रात पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, या पाईपलाईन सतत फुटत असताना एमआयडीसीचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. एवढेच नव्हे तर गुरुवारी बदलापूर एमआयडीसी भागामध्ये अनेक कारखानदारांनी आपल्या कंपनीतील रासायनिक सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले होते, तर काही कारखानदारांनी हे सांडपाणी थेट उल्हास नदीच्या पात्रात सोडले.


उल्हास नदीतून अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा


उल्हास नदी भरुन वाहत असल्यामुळं त्यात कोणताही परिणाम दिसत नसला तरी बदलापुरातील कारखानदार रासायनिक सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडत असल्यानं त्यांच्या या बेजबाबदारपणावर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. उल्हास नदीतून अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा केला जात असताना कारखान्यातील सांडपाणी थेट नदीत सोडणे हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट कारखान्यातील सांडपाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसीचे अधिकारी एस.व्ही.पोवार यांना विचारणा केली असता काहीही बोलण्यास नकार दिला आहे.


राज्यात जोरदार पाऊस


गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं राज्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काल मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain: पालघर, ठाणे, रायगड, रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आज बंद; मुसळधार पावसाची शक्यता