MP Kapil Patil : ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्षपद फॉर्म भरण्याची तारीख, भूमिका जाहीर केली आणि मुख्यमंत्री पद सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. काँग्रेसवर आता कोणाचाच कंट्रोल राहिलेला नाहीये. दररोज वेगवेगळी नावे आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडे भारत जोडो आंदोलन सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस तुटायला लागली आहे. भारत जोडायचा की काँग्रेस जोडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचा मिश्किल टोला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी काँग्रेसला लगावला.


केंद्रीय मंत्री कपिल पाटील आज कल्याण खडकपाडा येथे साई युवक मंडळ, मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात भेट देण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान कपिल पाटील यांनी या मंडळाला भेट दिल्याने सर्वांचा भुवया उंचावल्या होत्या. याबाबत कपिल पाटील यांनी माझ्या मतदारसंघातील गणपती, देवीच्या दर्शनाला मी जात असतो म्हणून आज या ठिकाणी आलो असे सांगितले. पुढे बोलताना कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षात  काँग्रेस अध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेच वरून मिश्किल प्रतिक्रिया दिली. 


कपिल पाटील यांनी तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे.  भाजप अध्यक्ष निवडताना कधीही कोणत्याही प्रकारचा वाद होत नाही. काँग्रेस परंपरा होती पूर्वी गांधी घराणे हे सांगेल ते अध्यक्ष होणार मात्र आता अशी परिस्थिती राहिलेली नाही.  ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्षपद फॉर्म भरण्याची तारीख,भूमिका जाहीर केली आणि मुख्यमंत्री पद सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. काँग्रेसवर आता कोणाचाच कंट्रोल राहिलेला नाहीये. दररोज वेगवेगळी नावे आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडे भारत जोडो आंदोलन सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस तुटायला लागली आहे. भारत जोडायचा की काँग्रेस जोडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र भारत जोडो अभियान ते राबवत आहेत मात्र भारताला तोडले आहे कोणी? मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत अखंड आहे. यापूर्वी पाचशे वर्षांपूर्वी जो भारत होता तो अखंड भारत करण्याचे काम आपण करत आहोत, काँग्रेसने भारताचे विभाजन केले. भारत जोडो करण्याआधी पाकिस्तानला जोडले पाहिजे. ही भूमिका घेऊन चाललेलं पाहिजे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची काय परिस्थिती झालेली आहे हे जनतेला माहिती आहे. मोदींना आव्हान देण्यासाठी लढवत असलेल्या शक्कल आता त्यांच्यावरच उलटू लागल्या असल्याचे सांगितले.