Bhiwandi Fire : भिवंडी तालुक्यातील गोदामांमध्ये अग्नीतांडव सुरुच आहे. रात्रीच्या सुमारास पाऊस पडत असतानाच वळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोब कॉम्प्लेक्समधील गोदाम संकुलात भीषण आग लागली. चार गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. यामध्ये एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंगमशीन, मायक्रो ओव्हन असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. 


आगीचं कारण अस्पष्ट 


दरम्यान, या गोदामांना नेमकी आग का लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.आग पाहता पाहता भडकत गेल्यानं चार गोदामात पसरली. या आगीच्या भक्ष्यस्थानी गोदामामध्ये साठवलेली कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे आणि कल्याण येथील अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतू पाण्याचा तुटवडा भासत असल्यानं त्यात एसी फ्रिज यांचे कॉम्प्रेसर फुटत असल्याने आग पुन्हा पुन्हा भडकत होती.


आग लागण्याचे नेमक कारण अस्पष्ट असून या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सहा ते सात तास लागणार असल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.