ठाणे:  बदलापुरातील (Badlapur)  नराधमाचं आरोपपत्र घेण्यास वकिलांनी  नकार दिला आहे. कल्याण कोर्टातील वकिलांनी अक्षय शिंदेचे आरोपपत्र घेण्यास नकार दिला आहे. तसेच बदलापूर रेल्वे पोलिसांनी  अटक केलेल्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या अजामीनपात्र गुन्ह्यांविरोधात वकील आक्रमक झाले आहेत.  आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.


आम्ही जी  भूमिका परवा  घेतली तीच आज  आणि उद्या असणार आहे . बदलापूरातील कृत्य निंदनीय आहे. जनावरांना देखील लाजवणारे कृत्य आहे. ज्या  मुलीला काही कळत नााही. साडे तीन वर्षाच्या मुलीचे वय हे अंगाखांद्यावर खेळायाचे आहे. साडेतीन  वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करणे हे अत्यंत घातक आहे. असे आरोपी समाजामध्ये वावरणे हे समाजाला घातक आहे. म्हणून असे आरोपी बाहेर येऊच नाही यसाठी आम्ही प्रयत्न होणे गरजेचे आहे.  त्यामुळे आमच्या संघटनेने निर्णय घेतला आहे त्याचे वकिलपत्र घेऊ नये असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे आमच्या संघटनेने ठरवले आहे कोणीही वकिलपत्र घेऊ नये,अशी भूमिका वकिलांनी घेतली आहे.  


संतापजनक घटना कशी घडली?


12 ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत तीन वर्षे आठ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी पुन्हा सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. 


प्रकार उघडकीस कसा आला?


यातील एका मुलीने शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच त्रास मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यास तयार नसल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं


कोणत्या शाळेत घडली घटना?


ज्या शाळेत ही घटना घडली, ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमांतून शिक्षण दिले जाते. या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुदानित तर तर इंग्रजी माध्यमाचे वर्ग हे विनानुदानित आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200 च्या आसपास आहे 


पोलिसांनी कशी केली दिरंगाई?


आपल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं कळल्यार दोन्ही मुलींचे पालक प्रचंड हादरले. आणि त्यांनी 16 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र, गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप संबंधित मुलींच्या कुटुंबीयांनी केलाय


पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?


पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी सुरू झाली. दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यापर्यंत पोलीस पोहोचले. अखेर अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली


कोण आहे नराधम अक्षय शिंदे?


24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊ जाण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याच अक्षय शिंदेंने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले


शाळेकडून कोणती चूक झाली?


मुलींना शौचालयात नेण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे का दिली नाही? असा संतप्त सवाल पालकांनी विचारला. आरोपीला फाशी द्या, नाहीतर आमच्या हवाली करा, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं.


बदलापुरात कसा झाला उद्रेक?


संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी बंदलापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आंदोलकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर शाळेचं गेट तोडून आंदोलक आत घुसले आणि शाळेमध्ये तोडफोड केली. त्याचसोबत, आंदोलकांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेऊन रुळावर तीव्र आंदोलन केलं.


पोलिसांवर काय कारवाई झाली?


गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले. तसेच, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले.


हे ही वाचा 


बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला