ठाणे : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक (Badlapur School abuse Update) अत्याचार झाला.  त्याचे पडसाद काल राज्यभरातच नाही तर देशभरात उमटले. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.  बदलापुरच्या  शाळेतील विद्यार्थिंनीवर अत्याचार केलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे.  दरम्यान 24 वर्षीय आरोपी  अक्षय शिंदेचे तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात  म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहे. 


 बदलापूरच्या  आरोपी अक्षय शिंदेला आज सकाळी कल्याण कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या नराधमाचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांनी नकार दिलाय हे विशेष. आरोपी राहात असलेल्या खरवई गावातही संतप्त नागरिकांनी  त्याच्या घराची तोडफोड केल्याचं समोर आलं..  दरम्यान स्पेशल SIT टीमच्या प्रमुख आरती सिंग यांनी अज्ञात ठिकाणी पिडित मुलींचा जबाब नोंदवला, पिडित मुलीची आई आणि आजोबा यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला.


कोण आहे अक्षय शिंदे?



  • अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे

  • अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत 

  • अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई 

  • या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता 

  • एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला 

  • अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब 

  • अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या 

  • अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील

  •  मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात 


बदलापूर पूर्व येथील  खरवई गावातील एका चाळीमध्ये अक्षय शिंदे राहत होता . खरवई गावातील नागरिकांनी तोडफोड केली . अक्षयचे नातेवाईक अक्षयच्या शेजारी राहत होते.  त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली आहे.  तोडफोडीनंतर अक्षय यांचे कुटुंब सध्या खरवई बदलापूर या गावातून गायब आहे अक्षय यांच्या शेजारी राहणाऱ्या काही महिलांची चर्चा केली असता  त्यांनी अक्षयचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती दिली. तसेच त्याच्यासोबत आत्ता एकही पत्नी राहत नाही अशी माहिती दिली आहे.   


हे ही वाचा :


चिमुकल्या लेकींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे येईना, कल्याण कोर्टात काय घडलं?