Avinash Jadhav: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना बोगस मतदार (bogus voters Maharashtra) शोधून काढण्याचे आवाहन करताना याद्या स्वच्छ करण्याचे आवाहन केलं आहे. राज्यामध्ये बोगस मतदार याद्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेत मतदार यादी स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. आता याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळावा पार पडला. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बोलताना मनसेची 15 ते 20 हजार बूथ लेव्हल एजंटची फौज तयार असल्याचे म्हटलं आहे.

Continues below advertisement


तर त्यांची धिंड काढणार (MNS voter list campaign)


मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात या बूथ लेव्हल एजंटसह आम्ही तयारीला लागलो असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितलं. सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा काम बूथ लेव्हल एजंटमुळे होऊ शकतं, असं त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की यावेळी मी ठाण्यामध्ये सर्व एजंटना सांगितलं आहे की आता ज्या याद्या चालू आहेत त्यामध्ये 200-250 लोकांची नावे भेटतच नाही. त्यामुळे जे लोक भेटत नाही त्यांच्या नावावर लाल टिक केली जाणार आहे आणि तो जर माणूस मतदान करायला आला, तर कार्यकर्त्यांना सांगितले आहे की आवाज द्यायचा गोंड्या आला रे गोंड्या आला. त्यानंतर आम्ही लगेच आत घुसणार असा इशारा सुद्धा अविनाश जाधव यांनी दिला. यावेळी जर असे लोक मतदान करायला आले तर त्यांची धिंड काढणार असल्याचा इशारा सुद्धा दिला. जास्तीत बोगस मतदार शोधणाऱ्यांचा नागरी सत्कार करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.



इतर महत्वाच्या बातम्या