Avinash Jadhav , Thane : भाजपची पहिली यादी आली त्याच्यात वीस ते पंचवीस परप्रांती होते. यांना परप्रांतीय नगरसेवकांचा टक्का वाढवायचा आहे. नगरसेवक जास्त आले की महापौर पदासाठी हे दावा करणा. मात्र मुंबईचा महापौर हा मराठी होणार, असा विश्वास मनसे नेते आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी व्यक्त केला आहे. समजा परप्रांतीय (Mira Bhayandar Election) महापौर नाही झाला तर कृपाशंकर सिंह राजकारणातनं बाहेर होणार का? असा प्रश्नही अविनाश जाधवांनी केलाय. भाजप त्यांच्या नेत्यांच्या तोंडातून बोलायला लावत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईत राहून मराठी माणसाचा अपमान करत आहेत असेही अविनाश जाधव म्हणाले. येत्या 16 तारखेला मनसे आणि शिवसेनेचा महापौर असणार आणि ठाण्यात देखील मनसे-सेनेचा महापौर बसणार, असेही अविनाश जाधव म्हणाले.

Continues below advertisement

Avinash Jadhav : ....तर राज ठाकरे यांनी पाठीवर हात ठेवल्यानंतर राग जातो

दरम्यान, कोणी कितीही रागात असेल तरी राज ठाकरे यांनी पाठीवर हात ठेवल्यानंतर राग जातो. ठाण्यात कोणी नाराज नाही. एक इच्छुक होते आता राज साहेबांची भेट घेतली त्यामुळे त्यांचाही राग गेला आहे. तोच इच्छुक उमेदवा मला असाही म्हणाला एवढ्या वर्ष मनसेचं काम करतोय पण आज दिवसाच सार्थक झालं. आमच्याकडे लोक प्रेमासाठी काम करतात, पैशांसाठी काम करत नाही. असेही अविनाश जाधव म्हणाले

Continues below advertisement

Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीत पैशांचा प्रचंड पाऊस

डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipal Election) निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलं. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे या दोन उमेदवारांची बिनविरोध निवडून आल्या आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे. 'प्रभाग 18 अ'मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे. यावर बोलताना अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केले आहेत. कल्याण डोंबिवलीत पैशांचा प्रचंड पाऊस झाला आहे. दोनच्या वरती प्रत्येक एक एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत लागणार आहे यांना.

हे ही वाचा