Thane Ambernath News : अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील कुशिवली गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊ आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेच्या ठिकाणी तरुण तरुणीने गळफास घेतलेच्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी आत्महत्या करणारे दोघे प्रेमी युगुला असल्याची माहिती दिली आहे.
मृत तरुण-तरुणी प्रेमीयुगुल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोघांनी प्रेम प्रकरणातून आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मनीषा पाटील आणि विवेक पाटील आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीची नाव आहेत. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदानासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हे दोघेही कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात राहणारे आहेत. त्यांनी आपली जीवन यात्रा का संपवली याचा तपास हिल लाईन पोलीस करत आहेत.
दरम्यान, प्रेमी युगुलाने गळफास घेऊ आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. नेमकी या प्रेमी युगुलाने का आत्महत्या केली असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्े वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे. आत्महत्या करण्याला विविध कारणे देखील आहेत. पण अशा घटना सातत्यानं वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
सासरच्यांकडून टोकाचा मानसिक त्रास, परभणीत 21 वर्षीय महिलेनं संपवलं जीवन, पती, सासू सासऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल