Ajinkya Naik: "येणाऱ्या काळात ठाण्यामधून (Thane) अनेक क्रिकेटपटू मुंबई आणि भारतासाठी खेळताना दिसतील. ठाणे हे लवकरच क्रिकेटची पंढरी होणार आहे," असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी व्यक्त केला आहे. तसेच ठाण्यामध्ये लवकरच सॅटेलाईट अकॅडमीचे पूजन करू. येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यामध्ये एमसीएची स्वतःच्या मालकीची अकॅडमी असेल. ती संपूर्ण मोफत दरात असणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
Ajinkya Naik: ठाण्याला क्रिकेटची पंढरी बनवण्याचा प्लॅन
ठाणे स्पोर्टिंग क्लब ड्रेसिंग रूमच्या उद्घाटनानंतर अजिंक्य नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजिंक्य नाईक म्हणाले की, येणाऱ्या काळात ठाण्यामधून अनेक क्रिकेटपटू मुंबई आणि भारतासाठी खेळतील. मी हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. मागच्या वर्षापासून ठाण्यामध्ये अनेक ट्रायल रन मॅचेस देखील आमच्या एमसीएच्या वतीने सुरू केलेल्या आहेत. चांगले क्रिकेटपटू सुद्धा आम्हाला मुंबईसाठी मिळाले आहे. विकास रिपळे स्पोर्टिंग क्लबचे काउन्सलिंग मेंबर झाले. त्यामुळे स्पोर्टिंग क्लबला विकासाचा मार्ग मोकळा झाला. त्याच्याच उद्घाटनासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. येणारा काळात ठाणे हे क्रिकेटची पंढरी असणार आहे. ठाणे जिल्ह्यात मॅक्झिमम क्रिकेट या ठिकाणी शिफ्ट होत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पूर्णपणे खेळाडूंसाठी, क्लबसाठी मदत पोहोचवण्याचं काम निश्चितच करेल, असे त्यांनी सांगितले.
Ajinkya Naik: सॅटेलाईट अकॅडमीमधून मोफत प्रशिक्षण
अजिंक्य नाईक पुढे म्हणाले की, ठाण्यामध्ये लवकरच सॅटेलाईट अकॅडमीचे पूजन करू. येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यामध्ये एमसीएची स्वतःची मालकीची अकॅडमी असतील. ती संपूर्ण मोफत दरात असणार आहेत. ठाण्यात खेळाडूंना इंटरनॅशनल क्रिकेटसारखी फॅसिलिटी देऊ. एमसीएच्या माध्यमातून येणाऱ्या तीन वर्षात अनेक उपक्रम आपल्याला पाहायला मिळेल, असे त्यांनी म्हटले.
Ajinkya Naik: कुठलेही राजकारण नाही
एमसीएमधील राजकारणावर बोलताना अजिंक्य नाईक म्हणाले की, सगळे राजकीय पक्ष हे क्रिकेटचे फॉलोवर्स आहेत. क्रिकेटसाठी आपण सगळे एकत्र काम करत असतो. प्रत्येक शहरात आणि तालुक्यात आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अकॅडमी असतील. ठाण्यामध्ये आमचे एमसीएचे उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि विकास रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनच्या वतीने चांगले उपक्रम राबवू. 100 टक्के चांगली सुविधा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देऊ. आम्हाला एमसीएमध्ये कधी राजकारण कळत नाही. क्रिकेटसाठी आम्ही एकत्र येतो आणि चांगले निर्णय देखील घेतो. मला असं वाटत नाही या ठिकाणी कुठलेही राजकारण आहे. या ठिकाणी एकच शब्द चालतो ते क्रिकेट, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा