Thane Mumbra Accident : ठाण्यानजिकच्या मुंब्रा परिसरात एका सिमेंट मिक्सर वाहनाचा विचित्र अपघात झाला. अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर एका सोसायटीची संरक्षण भिंत तोडून उलटला. या अपघातात सात मुलंही दुर्दैवीरित्या जखमी झाल्याचं समजतेय. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनींही रात्री घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, अपघात झालेला सिमेंट मिक्सर वाहनाला पोलीस कर्मचाऱ्यांकडून हायड्राच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम करण्यात आले.
आरएमसी व्हॅनचा तोल जाऊन सोसायटीच्या आवारात कोसळल्याने सात लहान मुलं गंभीर जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंब्रा येथील सम्राट नगर येथे ही घटना घडली. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या खडी सिमेंट मिक्स करणाऱ्या आर एम सी व्हॅनचा अपघात शनिवारी रात्री घडला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार करण्यात आलेत. अपघात झाल्यानंतर आरएमसी व्हॅन चालक फरार झाला. घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव झाला होता.
मुंब्रातील सम्राट नगर परिसरात शनिवारी रत्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपासवरून सम्राट नगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. वाहनचालकाचा ताबा सुटल्याने मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाला. या अपघातामध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दलाचे जवान , इमर्जन्सी टेंडर , रेस्क्यु वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित झाले. या घटनेत मिक्सर पलटी झाल्याने सात स्थानिक रहिवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
या घटनेत ६ जण जखमी..
१) विशाल सोनावणे (पु/ २५ वर्षे / प्राईम हॉस्पिटल, मुंब्रा येथे दाखल करण्यात आले आहे.)
२) अशिक इनामदार (पु / 15 वर्षे / गौतमी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.)
३) प्रभाकर सलियान (पु / ४८ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)
४) अब्दुल वफा (पु/ ५० वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)
५) फरीद शेख (पु / ५४ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल, मुंब्रा)
६) आशा दाधवड (स्त्री / ५८ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.)
या घटनेमध्ये १ मृत व्यक्ती
१) नासिर शेख (पु / १४ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केल्यानंतर मृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.)