नवी दिल्ली: संपूर्ण माध्यम क्षेत्रासाठी महत्वाची बातमाी आहे. पुढील 12 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती देण्यात आली आहे. टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर BARC या संस्थेने हा निर्णय घेतला. BARC च्या या निर्णयाचं एनबीएने स्वागत केलं आहे.
या निर्णयाचे News Broadcasters Association NBA कडून समर्थन करण्य़ात आले आहे.


या आधी इतक्या मोठ्या कालावधीसाठी BARC ने आपलं काम थांबवल्याचं कधीही झालं नाही, पहिल्यांदाच BARC ने 12 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती दिली आहे.


वृत्तवाहिन्या चालण्यासाठी त्यांना महसूलाची गरज असते आणि हा महसूल त्यांना जाहिरीतींतून मिळत असतो. या जाहिराती वृत्तवाहिन्यांची टीआरपी किती आहे यावर मिळतात. टीआरपी त्या वाहिन्यांना मिळालेल्या रेटिंग्जवर ठरतो. हे रेटिंग्ज काढण्याचे काम BARC ही संस्था करते.


टीआरपीच्या घोटाळ्यासंबंधी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी जो खुलासा केला त्यावेळी BARC लाही लक्षात आले की या रेटिंग्जमध्ये फेरफार केले जाऊ शकतात. खोट्या रेटिंग्ज दाखवून वाहिन्या लोकांची आणि जाहिरातदारांची दिशाभूल करतात आणि अधिक पैसा मिळवतात.


या कारणामुळे आता या व्यवस्थेला अधिक सुरक्षीत बनवण्यासाठी BARC ने पुढील 12 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर BARC ची टेक्निकल टीम काम करणार आहे. लोकांना पैसे देऊन किंवा त्यांना कोणतेही अमिष दाखवून आता अशा प्रकारे रेटिंग वाढवता येणार नाही यासाठी BARC ठोस पावले उचलणार आहे.


BARC चे अध्यक्ष रजत शर्मा याव्र म्हणाले की गेल्या काही दिवसांत रेटिंग एजन्सीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भारत क्या देखता है या नावाखाली काहींनी चुकीच्या पध्दतीने आणि तर्कहीन आकड्यांच्य़ा आधारे खोट्या धारणा पसरवण्याचं काम केलं होतं. यापुढे आता टीव्हीवर फेक न्युज, तिरस्काराचा प्रसार आणि शिव्या देणे यासारखे प्रकार जास्त काळ चालणार नाहीत.


यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी BARC च्या या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांना तपास करताना काही मदत लागल्यास मुंबई पोलीस मदत करतील जेणेकरुन BARC ला भविष्यात एक निर्दोष व्यवस्था तयार करता येईल असे सांगितले आहे.


BARC ही संस्था टीआरपीचे रेटींग तयार करते. त्यासाठी य़ा संस्थेतर्फे देशभरात 30 हजार बॅरोमिटर बसवण्यात आले आहेत. त्याच्या स्टॅटिकच्या आधारे ती वेगवेगळ्या चॅनेलना टीआरपी रेटींग देते.