Moto x Play स्मार्टफोनवर घसघशीत सूट, फ्लिपकार्टवर खास ऑफर
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 01:26 PM (IST)
मुंबई: मोटोरोलानं मोटो X प्ले स्मार्टफोनवर घसघशीत सूट दिली आहे. मात्र, ही सूट अवघ्या काही अवधीसाठी आहे. या ऑफरमध्ये मोटो X प्ले स्मार्टफोनवर 2000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. ही खास ऑफर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे. मोटो X प्ले 16GB व्हर्जनची किंमत 17,499 रु. आहे. तर 32 जीबी डिव्हाइसची किंमत 18,999 रु. आहे. मात्र फिल्पकार्टवरील ऑफरमुळे 16 जीबी स्मार्टफोन 15,499 रुपयात मिळणार आहे. तर 32 जीबीचा डिव्हाइस 17,499 रुपयात मिळणार आहे. फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. मोटो x प्लेमध्ये 5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले, ज्यामध्ये 1080x1920 पिक्सल रेझ्युलेशन तर 1.7 GHz प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड लॉलिपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टम आहे. यामध्ये 3630 mAh बॅटरी क्षमता आहे. यामध्ये 21 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.