नवी दिल्लीः शाओमी 27 जुलैला स्मार्टफोनप्रेमींसाठी खास दोन प्रोडक्ट घेऊन येत आहे. शाओमीचा रेडमी नोट 4 आणि कंपनीचा पहिलाच लॅपटॉप बीजिंगमध्ये होणाऱ्या कंपनीच्या पत्रकार परिषदेमध्ये 27 जुलैला लाँच करण्यात येणार आहे, अशी माहिती शाओमीच्या वतीने देण्यात आली आहे.
शाओमी 27 जुलैला लॅपटॉप आणि स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र याच दिवशी Mi नोट 2 हा स्मार्टफोनही लाँच केला जाईल असा अंदाज लावला जाईल. या तीन प्रोडक्टपैकी कोणतेही दोन प्रोडक्ट 27 जुलैला लाँच करण्यात येतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
शाओमीचा पहिलाच लॅपटॉप
कंपनीचा पहिला लॅपटॉप अगोदर लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाओमीचा पहिला लॅपटॉप इंटेल अॅटम प्रोसेसरसह असून मेटल बॉडी असणार आहे. या लॅपटॉपचा लूक अॅपलच्या मॅकबूकसारखा असेल, असंही सांगितलं जात आहे.
हा लॅपटॉप दोन व्हर्जनमध्ये लाँच करण्यात येणार आहे. एका व्हर्जनची स्क्रिन 12.5 इंच आकाराची असेल तर दुसऱ्या लॅपटॉपची स्क्रिन 13.3 इंच आकाराची असेल. रेडमी नोट 4 देखील जबरदस्त फीचर्ससह असेल, असं सांगितलं जात आहे.