बीजिंगः शाओमीने आतापर्यंतचा सर्वात हायटेक फीचर्स असलेला Mi note 2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.

Mi note 2 च्या फ्रंट आणि बॅक साईडला 3D डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

या फोनमध्ये 5.7 इंच आकाराची स्क्रीन, 821 क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 128 GB स्टोरेज आणि 4.70mAh क्षमतेची बॅटरी, असे फीचर्स आहेत.



Mi note 2 ची कॅमेरा क्वालिटी खास असणार आहे. या फोनमध्ये सोनी सेन्सरचा 23 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय, शिवाय 4K क्वालिटीचा व्हिडिओ यामध्ये रेकॉर्ड करता येणार आहे.

चीनमध्ये या फोनच्या 4 GB रॅम असणाऱ्या मॉडेलची किंमत 2799 युआन म्हणजे 27 हजार 600 रुपये आहे. तर 6 GB रॅम असणाऱ्या मॉडेलची किंमत 3499 युआन म्हणजे 34 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे.