शाओमीचा ख्रिसमस सेल, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर भरघोस सूट
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2016 04:15 PM (IST)
मुंबई : स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमीनं ख्रिसमससाठी आपल्या उत्पादनांवर भरघोस सूट दिली आहे. यात स्मार्टफोन, पॉवर बँक आणि हेडफोन्सवर ख्रिसमस सेलअंतर्गत घसघशीत सवलत दिली आहे. शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi5, ज्याची किंमत 19999 रुपये आहे, त्यावर 3000 ची सूट देण्यात आली आहे. शाओमीची 20000 mAh पॉवरबँक 1899 रुपयांमध्ये उपलब्ध असेल, ज्यावर 600 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर 10000 mAh पॉवरबँक 999 रुपयांना उपलब्ध असेल. या पॉवरबँकवर 300 रुपयांची सवलत देण्यात येईल. शाओमीच्या हेडफोन्सवर 200 रुपयांची सूट देण्यात आली आहे, त्यामुळे 1799 रुपयांचे हेडफोन्स 1599 रुपयांना मिळणार आहेत. शाओमीनं आपल्या उत्पादनांवर मोठी सूट देत आहे. सोबतच एक वर्षासाठी हंगामा म्युझिकचं सबस्क्रीप्शनही मोफत दिलं जाणार आहे.