मुंबई : लेनोवो कंपनीचं सबब्रँड ‘झुक’ने आपला नवा स्मार्टफोन ‘झुक एज’ लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनची 1 जानेवारीपासून चीनमधील बाजारात आगमन होणार आहे. 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असे या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट आहेत.


4 जीबी रॅम व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत 2,299 युवआन (जवळपास 22 हजार 500 रुपये), तर 6 जीबी व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत 2,499 युआन (जवळपास 24 हजार 500 रुपये) एवढी आहे. सिरेमिक व्हाईट, टायटॅनियम आणि क्रिस्टल ब्लॅक या रंगांमध्ये दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध असतील.

‘झुक एज’ फीचर्स :

  • 5 इंचाचा एचडी रिझॉल्युशन स्क्रीन

  • कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन

  • 35GHz क्वार्ड कोर स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट

  • टाईप-सी पोर्ट

  • U टच फिंगरप्रिंट सेन्सर

  • ड्युअल सिम स्लॉट

  • 0 नॉगट ओएस ऑपरेटिंग सिस्टम

  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 64 जीबी इंटरनल स्टोरेज (स्टोरेज वाढवण्याची सुविधा)

  • 3100mAh क्षमतेची बॅटरी