मुंबई : शाओमी 11 सप्टेंबरला चीनमध्ये नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन Mi Mix 2 लाँच करणार आहे. या फोनसोबतच Mi नोट 3 हा स्मार्टफोनही लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे.


कंपनीने नुकतीच चिनी वेबसाईट वीबोच्या माध्यमातून Mi Mix 2 च्या लाँचिंगची माहिती दिली होती. तर कंपनीचे सहसंस्थापक लिन बिन यांनीही Mi नोट 3 च्या लाँचिंगबाबत संकेत दिले होते.

लीक रिपोर्ट्सनुसार Mi Mix 2 मध्ये 6.4 इंच आकाराची बेझेल स्क्रीन असेल. 835 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 6GB रॅम असण्याची शक्यता आहे. तर इंटर्नल स्टोरेज 256GB पर्यंत असण्याची शक्यता आहे.

Mi Mix 2 मध्ये 16 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअल कॅमेरा असेल. तर 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. हा फोन फ्रेंच डिझायनर फिलिप स्ट्रॅकने डिझाईन केला आहे. याच कंपनीने या सीरिजचा पहिला Mi Mix हा स्मार्टफोनही डिझाईन केला होता.

शाओमी Mi Mix 2 ची किंमत जवळपास 33 हजार 949 रुपये असण्याची शक्यता आहे. भारतात हा स्मार्टफोन कधीपर्यंत लाँच होईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.