मुंबई: शाओमी रेडमी 4Aचा पहिला फ्लॅश सेल काल (गुरुवार) झाला. अॅमेझॉन आणि Mi.comवर या स्मार्टफोनची विक्री सुरु आहे. पहिल्याच दिवशी विक्रीमध्ये शाओमीच्या या स्मार्टफोन एक नवा विक्रम रचला आहे.


लाँचिंगच्या दिवशी कमी वेळात जास्त स्मार्टफोन विक्रीचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अॅमेझॉन आणि Mi.com या दोन्हीवर रेडमी 4A चे तब्बल 250,000 स्मार्टफोन अवघ्या 4 मिनिटात सोल्ड आऊट झाले.

अवघ्या 5,999 रुपये किंमत असलेला हा  स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यासाठी ग्राहकांच्या अक्षरश: उड्या पडल्या.

शाओमी रेडमी 4A चे खास फीचर्स:

– 5 इंच स्क्रिन आणि रेझ्युलेशन 720×1280 पिक्सल

– ड्यूल सिम आणि पॉलिकार्बोनेट बॉडी

– मार्शमेलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टम

– 1.4Ghz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर आणि 2जीबी रॅम

– 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

– 16 जीबी इंटरनल मेमरी असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.

– वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ यासारखे फीचर

– बॅटरी 3120 mAh क्षमता

संबंधित बातम्या:

शाओमीचा रेडमी 4A स्मार्टफोन लाँच, किंमत 5,999 रु.

शाओमी Redmi 4A ग्राहकांना मिळणार तब्बल 28 जीबी 4जी डेटा