मुंबई : मोटोचे दोन स्मार्टफोन मोटो G5S आणि मोटो G5S प्लस यांच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. नव्या किंमतीसह हे स्मार्टफोन अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोन तब्बल 2000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. ही घट काही दिवसांपुरतीच करण्यात आली आहे.


आता मोटो G5S 11,999 रुपये आणि मोटो G5S प्लस 13,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. लाँचिंगच्यावेळी G5S किंमत 13,999 रुपये आणि G5S प्लसची किंमत 15,999 रुपये होती.

हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड नॉगट 7.0वर आधारित आहेत. यामध्ये मेटल बॉडी डिझाईनसह फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.

पाहा मोटो G5S आणि G5S प्लसचे खास फीचर्स

मोटो G5S : मोटो G5Sमध्ये 5.2 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. तर याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्लॉलकॉम प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 3 जीबी रॅमही देण्यात आली आहे. तसेच 32 जीबी इंटरनल मेमरीही देण्यात आली आहे. याशिवाय 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.

यामध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 3000 mAh बॅटरीही देण्यात आली आहे. ज्याला टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

मोटो G5S प्लस : या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे. 3जीबी रॅम + 32 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी असे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.

यामध्ये 13 मेगापिक्सल ड्यूल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अॅपल, मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होचे फोन महागणार

भारतातील पहिल्या ड्युअल कॅमेरा फोनच्या किंमतीत कपात

तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा!