मुंबई: मोबाइल कंपनी शाओमीनं आपला नवा स्मार्टफोन Mi Max 2 भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Mi Maxचा अपग्रेडेड व्हेरिएंट आहे. याची किंमत 16,999 रुपये असणार आहे.


27 जुलैपासून हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर मिळणार आहे. याच स्मार्टफोनसोबत जिओची एक स्पेशल ऑफरही ज्यामध्ये यूजर्सला 100 जीबी फ्री डेटा मिळणार आहे.


Mi Max 2 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन

Mi Max 2 मध्ये 6.44 इंच स्क्रीन असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. तसेच यामध्ये 2Ghz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅ्गन प्रोसेसर आहे. तसेच 4 जीबी रॅमही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये रिअर फिंगर प्रिंट सेन्सर असणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. याची बॅटरी तब्बल 5300 mAh आहे.