मुंबई : काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या घटना समोर आल्या. देशभरातही असे प्रकरणं समोर येत असल्याने जीवनावश्यक गरज बनलेलं व्हॉट्सअॅप वापरताना खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण आता तुमचे बँक तपशील चोरी करु शकणारे मेसेजही व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहेत.
तुमचं फ्री व्हॉट्सअॅप सबस्क्रीप्शन संपलं आहे. सेवा चालू ठेवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन पेमेंट करा, असा मेसेज व्हॉट्सअॅपच्या नावाने व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंट ऑप्शनमध्ये जाता, त्यानंतर तुमचा बँक तपशील चोरी केला जातो.
https://twitter.com/actionfrauduk/status/885782359794229248
हा मेसेज सध्या इंग्लंडमधील यूझर्सना येत आहे. त्यामुळे भारतातही असे फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हॉट्सअॅप सेवा सध्या फ्री आहे, त्यासाठी कोणतेही पैसे मोजण्याची गरज नाही, हे यूझर्सने लक्षात ठेवण्याची गरज आहे.
व्हॉट्सअॅप सुरुवातीचं एक वर्ष मोफत असेल, त्यानंतर पैसे मोजावे लागतील, अशी घोषणा व्हॉट्सअॅपने केली होती. मात्र जानेवारी 2016 मध्ये व्हॉट्सअपने हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
सावधान! हा व्हॉट्सअॅप मेसेज तुमचा बँक तपशील चोरी करु शकतो!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2017 12:14 PM (IST)
तुमचं फ्री व्हॉट्सअॅप सबस्क्रीप्शन संपलं आहे. सेवा चालू ठेवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन पेमेंट करा, असा मेसेज व्हॉट्सअॅपच्या नावाने व्हायरल होत आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -