Xiaomi Launch Event : आपल्या बजेट स्मार्टफोननी भारतीयांच्या मनावर राज्य करणारी चिनी कंपनी Xiaomi लवकरच आपला लॉन्च इव्हेंट आयोजित करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 सप्टेंबर रोजी कंपनी आपल्या ग्लोबल लॉन्च इव्हेंटमध्ये Xiaomi Mi 11T सीरीजसोबत Xiaomi चे आणखी काही प्रोडक्ट्स लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Xiaomi Mi 11 T सीरीजच्या अंतर्गत दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये एक Vanilla आणि दुसरा Pro मॉडेल असणार आहे. याच्या प्रो मॉडेलसाठी एक दावा करण्यात आला आहे की, याची बॅटरी केवळ आठ मिनिटांतच फुल चार्ज होणार आहे. 


खास तंत्रज्ञानाचा वापर 


शाओमीनं Mi 11T Pro चा टीझर लॉन्च केला आहे. ज्यामध्ये असं समजतंय की, या स्मार्टफोनमध्ये 120W HyperCharge टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच, याची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी काहीच मिनिटांचा अवधी लागणार आहे. 


केवळ 8 मिनिटांतच करा पूर्ण चार्ज 


Xiaomi नं दिलेल्या माहितीनुसार, 120W HyperCharge टेक्नोलॉजी मार्फत 4000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन केवळ आठ मिनिटांत फुल चार्ज होतो. तसेच याच्या दुसऱ्या फिचर्सबाबत बोलायचं झालं तर यामध्ये Snapdragon 888 SoC प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच या फोनमध्ये OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट  120Hz असणार आहे. 


कॅमेरा 


Xiaomi Mi 11 T Pro स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असू शकतो. दरम्यान, याच्या फ्रंट कॅमेऱ्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 


Realme 8s 5G सोबत स्पर्धा 


Xiaomi Mi 11 T Pro स्मार्टफोनचा भारतात Realme 8s 5G शी स्पर्धा होणार आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट  90 हर्ट्ज होणार आहे. हा फोन MediaTekIndia Dimensity 810 5G चिपसेटसोबत लॉन्च करण्यात येणारा पहिला फोन आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा  64 मेगापिक्सलचा असणार आहे.