मुंबई: चीनी कंपनी शाओमीचा दिवाळी सेल आजपासून सुरु झाला आहे. तीन दिवस चालणारा हा सेल बुधवारी संपणार आहे. या सेलमध्ये कंपनी तीन दिवसांपर्यंत एक रुपयात फ्लॅश डील, किंमती सूट, कूपन आणि इतर दुसऱ्या ऑफर देणार आहे. दुपारी 2 वा. एक रुपयांचा फ्लॅश डील आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय शाओमी Mi मॅक्स प्राइम स्मार्टफोन 19,999 रु. लाँच करण्यात आला आहे. तर शाओमी Mi 5वर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर रेडमी नोट 3 वर 1000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे.

दररोज दुपारी 2 वाजता फ्लॅश सेल असणार आहे. सोमवारी रेडमी 3एस आणि ब्ल्यूटूथ स्पीकर एका रुपयात खरेदी करता येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रेडमी नोट 3 आणि 20000 एमएएच पॉवर बँक खरेदी करता येणार आहे. तर तिसऱ्या दिवशी शाओमी Mi 4 आणि Mi बॅण्ड 2 हे अवघ्या 1 रुपयात खरेदी करता येणार आहे.

शाओमीनं गो स्मॅश नावाच एक खेळही आयोजित केला ङे. जो खेळून यूजर्स मोफत डिव्हाइस आणि कूपन जिंकू शकतात. तसंच प्रत्येक खरेदीवर शाओमीनं इतर ऑफर्स ठेवल्या आहेत.