नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी चायनीज कंपनी शाओमीने आपला पहिला ऑफलाईन स्मार्टफोनही बाजारात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील कंपनीचा रेडमी 3S+ हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च झाला.


कंपनीच्या या पहिल्या ऑफलाईन स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 1.4 GHz ऑक्टा कोर क्वॉलकॉम प्रोसेसरच्या या स्मार्टफोनमध्ये 430 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 2 जीबीची रॅम देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची मेमरी 32 जीबी असून बॅक पॅनेलवर फिंगर प्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रिअर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 4100mAh ची बॅटरी बॅकअप आणि कनेक्टिव्हीटीसाठी VoLTE, LTE वाय-फाय, ब्लूटूथ, 3.5mm ऑडिओ जॅक आणि यूएसबी पोर्टसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.

कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात फक्त 9,499 रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे.