मुंबई : फ्लिपकार्टच्या 'बिग बिलियन डे' सेलला आजपासून सुरुवात झाली आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच इत्यादी डिव्हाईसवर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे. शिवाय, एक्सचेंज ऑफरचा पर्यायही दिला जाणार आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे केवळ चार दिवसच सेल सुरु राहील.
कोणत्या स्मार्टफोनवर ऑफर?
फ्लिपकार्टच्या 'बिग बिलियन' सेलमध्ये आसूस जेनफोन 2, लेईको ले 2, लेईको ले 1s ईको, मोटो X प्ले या स्मार्टफोनवर मोठी सवलत दिली जाणार आहे.
आसूसच्या स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांची सूट, म्हणजेच आसूस जेनफोन 2 स्मार्टफोन तुम्ही जवळपास 9 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. Le 2 स्मार्टफोन या सेलमध्ये 10 हजार 499 रुपयांना मिळेल. 11 हजार 999 रुपये एवढी या स्मार्टफोनची मूळ किंमत आहे. Le 1s ईकोवर 2 हजार रुपयांची सूट दिली जात असून, 7 हाजर 999 रुपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध असेल.
याशिवाय, फ्लिपकार्टवर काही स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरही दिली आहे. मोटो X प्लेवर 4 हजार 500 रुपयांचं डिस्काऊंट जाहीर करण्यात आले आहे.
अॅपल वॉच
फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलमध्ये अॅपल वॉचवर मोठी सूट देण्यात आली आहे. अॅपल वॉचचं 42mm सपोर्ट एडिशन 19 हजार 990 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याची मूळ किंमत 29 हजार 990 रुपये आहे. म्हणजेच 10 हजार रुपयांची बंपर सूट दिली जात आहे. या अॅपल वॉचचे अनेक व्हेरिएंटही आहेत.
मायक्रोमॅक्स एलईडी टीव्ही
या सेलमध्ये भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सचा 40 इंचाचा एलईडी स्मार्ट टीव्ही 25 हजार 990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या टीव्हीची बाजारातील किंमत 39 हजार 9990 रुपये आहे.
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसची प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवरुन बुक करत असाल, तर सिटी बँकेच्या यूझर्सना 10 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल. शिवाय, फोनसोबत 24 हजार 500 रुपयांपर्यंतचं एक्सचेंज ऑफरही मिळेल.
गूगल क्रोमकास्ट 2
सेलमध्ये गूगल क्रोमकास्ट 2 वर चांगली सूट असून, 2 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात याची किंमत साधारणत: 3 हजार 999 रुपये आहे. गूगल क्रोमकास्ट एक मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाईस असून, याच्या मदतीने तुम्ही टीव्ही सेटवर स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरुन कंटेट कनेक्ट करुन चालवू शकता.