Xiaomi 13 Series : Xiaomi सीरिजमधील Xiaomi 13 स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या सीरिजमधील दोन स्मार्टफोन Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लॉन्च करण्यात आले आहेत. Xiaomi ची ही नवीन स्मार्टफोन सीरिज गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Xiaomi 12 आणि 12 Pro चा एडव्हान्स स्मार्टफोन आहे. Xiaomi 13 आणि 13 Pro हे दोन्ही स्मार्टफोन Qualcomm चे नवीन आणि मजबूत Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आणि फास्ट चार्जिंगसह लॉन्च केले गेले आहेत. Xiaomi ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन तसेच Redmi Buds 4 earbuds, Watch S1 Pro घड्याळ आणि नवीन यूजर इंटरफेस MIUI 14 लॉन्च केले आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला Xiaomi 13 च्या नवीन स्मार्टफोन सीरिजबद्दल तपशीलवार माहिती सांगणार आहोत.


Xiaomi 13 आणि 13 Pro वैशिष्ट्य (Xiaomi 13 Series Specification) :


Xiaomi 13


Xiaomi 13 स्मार्टफोनमध्ये 6.36-इंचाचा OLED डिस्प्ले (2400×1800), रिफ्रेश रेट 120Hz, पंच होल कटआउट, HDR10+ आणि 1900 nits च्या पीक ब्राइटनेससह आहे. Xiaomi चे हे दोन्ही स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC आणि Adreno GPU सह लॉन्च करण्यात आले आहेत. 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. हे दोन्ही Xiaomi चे स्मार्टफोन Android 13 वर आधारित नवीन MIUI 14 वर चालतात.






कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोन 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, GPS, NFC आणि USB टाईप-सी पोर्टसह लॉन्च केला गेला आहे. स्मार्टफोनमधील सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले सिक्युरिटी लॉन्च करण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी, 67W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W वायरलेस रिव्हर्स चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.


Xiaomi आणि Leica ने Xiaomi 13 सीरिजच्या कॅमेरा सेटअपसाठी भागीदारी केली आहे. व्हॅनिला मॉडेलमध्ये Leica ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50MP Sony IMX800 प्रायमरी कॅमेरा, 10MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे.  स्मार्टफोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील लॉन्च होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


भारतात लॉन्च होतोय 200MP कॅमेरावाला स्मार्टफोन; किंमतही तुमच्या खिशाला परवडणारी