मुंबई : 24 ऑगस्टला जिओ फोनची बुकिंग सुरु झाल्यानंतर एकाच दिवसात हा फोन 60 लाख ग्राहकांनी ऑर्डर केला आहे. या फोनला एवढा प्रतिसाद मिळाला की कंपनीला यो फोनची प्री बुकिंग बंद करावी लागली. ग्राहकांना या फोनसाठी आता केवळ नोंदणी करता येणार आहे.

जिओ फोन मिळण्याचा मुहूर्त अखेर ठरला!


देशभरातून या फोनसाठी आतापर्यंत जवळपास 10 लाख ग्राहकांनी नोंदणी केल्याची माहिती रिलायन्सने दिली आहे. देशतील मेट्रो शहरं, छोटी शहरं आणि ग्रामीण भागातूनही या फोनला मोठी मागणी आहे. ज्या ग्राहकांनी फोन बुक केला आहे, त्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेर फोन हातात पडणार आहे.


जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, मोफत फोन मिळवण्यासाठी काय कराल?

जिओ फोन बुक करताना तुम्हाला 500 रुपये द्यायचे आहेत आणि फोन घेताना उर्वरित एक हजार रुपये द्यावे लागतील. हा फोन ग्राहकांना मोफत मिळणार आहे. मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये मोजावे लागतील, जे तीन वर्षांनी ग्राहकांना परत मिळतील.

जिओ फोनचा नेमका फायदा काय?

जिओ फोनचा फायदा डेटा वापरणाऱ्यांसोबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण ग्रामीण भागात फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय इतर दूरसंचार कंपन्यांचे व्हॉईस कॉल दर सर्वच ग्राहकांना परवडणारे नाहीत. मात्र जिओच्या 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात येणार आहे, हा त्याचा सर्वात मोठा फायदा असेल. तुम्ही सतत इंटरनेट वापरत नसाल, तरीही तुम्हाला मोफत व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल.

संबंधित बातम्या :

जिओ फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट नसणार!

खुशखबर! जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपचं स्पेशल व्हर्जन चालणार?

‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस

भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!

रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन