मुंबई : अॅपलचा आयफोन 8 आता लवकरच जगासमोर येणार आहे. कारण की, अॅपलनं आपल्या सर्वात मोठ्या इव्हेंटसाठी प्रेस इनव्हाईट पाठवणं सुरु केलं आहे. अॅपलनं 12 सप्टेंबरला आपल्या मुख्यालयातील स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये एका इव्हेंटचं आयोजन केलं आहे.
या इव्हेंटमध्ये कंपनी आपला मोस्ट अवेटेड आयफोन 8 लाँच करु शकतं. याशिवाय कंपनी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन 7S हे स्मार्टफोन हे तीन नवे आयफोन लाँच करु शकतं. तसेच अॅपल टीव्हीचं नवं व्हर्जनही लाँच केलं जाऊ शकतं.
रिपोर्टसनुसार, आयफोनची 8ची किंमत 999 डॉलर असण्याची शक्यता आहे.
लीक रिपोर्टनुसार, आयफोन 8मध्ये 5.8 इंच स्क्रिन देण्यात आलं आहे. पण यामध्ये अॅपल इन स्क्रिन फिंगरप्रिंट सेंसर असणार की नाही याबाबत गूढ कायम आहे.
या फोनमध्ये अॅपल 3D फेस स्कॅनिंग फीचर लाँच करु शकतं. म्हणजेच फेस स्कॅनच्या माध्यमातून फोन अनलॉक करता येऊ शकतं. असंच काहीसं फीचर आइरिस स्कॅनरच्या नावानं सॅमसंगनं गॅलक्सी S8 मध्ये लाँच केलं होतं.
दरम्यान, आयफोन 8 मध्ये नेमके काय-काय फीचर असणार आहेत हे 12 सप्टेंबरलाच समोर येईल.
संबंधित बातम्या :
आयफोन 8 च्या लाँचिंगपूर्वी ऑफर, आयफोन 7 प्लसवर 24 हजार रुपयांपर्यंत सूट