नवी दिल्ली : वाट्सअप मॅसेजसच्या सुरक्षेवरुन देशातच नाही तर जगभरात खळबळ माजली आहे. लोक वाट्सअपला अनइंस्टॉल करुन अन्य पर्याय शोधत आहेत. परिणामी वाट्सअप डाउनलोडींगच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. गूगल प्ले स्टोरमध्ये सर्वात जास्त डाउनलोड होणाऱ्या अॅप्समध्ये वाट्सअपची आता चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
इकनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, सॅन फ्रान्सिस्को येथे मुख्यालय असलेल्या अॅप अॅनालिटिक्स फर्म, 'अॅप एनी'ने याबद्दल माहिती गोळा केली आहे. यांच्या अहवालानुसार वाट्सअपचे हेरिगिरी प्रकरण समोर आल्यानंतर टेलीग्राम आणि सिग्नल या दोन मॅसेजिंग अॅप आणि कॉलिंग अॅप्सच्या डाउनलोड होण्याची संख्या वाढली आहे.
सिग्नल
iOS स्टोअरवर सिग्नल या अॅप्सची डाउनलोडींग संख्या इतकी वाढली आहे की सोशल नेटवर्किंग अॅप डाउनलोड कॅटेगरीत 'सिग्नल'चा नंबर 105 वरुन 39व्या स्थानावर गेला आहे. ही माहिती भारतातील असून 3 नोव्हेंबरला नोंदवण्यात आली आहे. गूगल प्ले स्टोअरमध्येही या अॅप्स डाउनलोड करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आठवड्यापूर्वी भारतात कम्युनिकेशन अॅप डाउनलोड कॅटेगरीत याचे स्थान 255 वे होते. 1 नोव्हेंबरला याने 31 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
टेलीग्राम
दुसरीकडे रशियन अॅप टेलीग्रामच्या डाउनलोडींग संख्येतही वाढ झाली आहे. टेलीग्राम एका विशिष्ट प्रोटोकॉलचा वापर करते, ज्यामध्ये मॅसेज खूपवेळा तपासले जातात. यासोबतच मॅसेजची लांबीसुद्धा तपासली जाते. जर सेंडरने ३२ कॅरक्टरचा मॅसेज पाठवला असेल तर रिसीव्हरला पूर्ण मिळाला का? याची खात्री ते करतात. टेलीग्राम पाठवलेल्या मॅसेजला एक युनिक सीक्वेंस नंबर देते, जो रिसीव्हरला मिळाल्यानंतर तो सीक्वेंस क्रॉसचेक केला जातो. टेलीग्राम वर पाठवलेले मॅसेज, फाइल्स, डाटा आणि फोटो वापरकर्त्याच्या फोन नाही तर क्लाउडवर स्टोअर होतात. ज्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बॅकअपची गरज नाही. विशेष म्हणजे यावर कितीही मोठी फाइल सहज पाठवता येते.
काय आहे वाट्सअपचे हेरिगिरी प्रकरण?
इस्राईलची सायबर इंटेलिजेन्स कंपनी NSO ने आपल्या स्पायवेअर पेगाससचा वापर भारतात केल्याचा खुलासा वाट्सअपने केला होता. याआधारे मे महिन्यात भारतातल्या पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वाट्सअपची हेरिगिरी केली होती. या प्रकरणी वाट्सअपने एनएसओ विरोधात खटला दाखल केला आहे.
Whatsapp सुरक्षेवरुन लोकांमध्ये गोंधळ! या 2 Apps ला मिळतोय फायदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2019 06:44 PM (IST)
वाट्सअप हेरिगिरी प्रकरणावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोक वाट्सअपला अनइंस्टॉल करुन अन्य पर्याय शोधत आहेत. याचाच फायदा अन्य 2 अॅप्सला होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -