मुंबई : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच तुमच्या मोबाईल नंबरबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. व्हॉट्सअॅप तुमचा मोबाईल नंबर सहकारी कंपनी फेसबूकसोबत शेअर करणार आहे.  फेसबूकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती व्हॉट्सअॅप युझर्सपर्यंत पोहोचतील, हा त्यामगचा हेतू आहे.


 

या जाहिराती फेसबूकवर असतील, त्याचा व्हॉट्सअॅप जाहिरातींशी काहीही संबंध नसेल, असा कंपनीचा दावा आहे.

 

मात्र हे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपला जगभरातील हजारो कोटी युझर्सचा डेटा कसा सुरक्षीत राहिल, हा विश्वास देणं आवश्यक आहे.

 

तुमचा नंबर फेसबूकशी शेअर करायचा की नाही, असा पर्याय व्हॉट्सअॅपद्वारे  युझर्सना एका मर्यादित काळासाठी विचारला जाईल.

 

फेसबूकशी तुमचा नंबर शेअर केला, तरीही तो अत्यंत सुरक्षीत असेल, अशी ग्वाही व्हॉट्सअॅपने दिली आहे.  व्हॉट्सअॅपच्या मते, " मोबाईल नंबर शेअर केल्यामुळे फेसबूक मॅपिंगद्वारे फ्रेन्ड सजेशन आणखी उत्तम होईल. तसंच जास्तीत जास्त जाहिरातीही पोहोचतील".

 

तसंच आमचा व्यवसाय आमच्या करारबद्ध ग्राहकांपर्यंत कसा पोहोचता येईल, याचीही आम्ही चाचपणी करत आहोत, असंही व्हॉट्सअपने म्हटलं आहे.

 

बँक ट्रँझक्शन, विमानाचं वेळापत्रक यासारखी माहिती नोटिफिकेशनद्वारे मिळेल.

 

युझर्सची डोकेदुखी वाढणार?

व्हॉट्सअॅप व्यवसाय वाढीसाठी नवी आयडिया आणली असली, तर युझर्सना मात्र ती फारशी आवडेल यात शंका आहे. कारण प्रत्येक युझर्सला आपला डेटा सुरक्षीत राहावा हीच भावना असते. त्यातच आता नंबर थेट फेसबूशी जोडला जात असल्याने ही भावना आणखीनच वाढेल.