WhatsApp Tips : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp चा वापर जगभरातील लाखो लोक चॅटिंग आणि फोटो शेअरिंगसाठी करतात. व्हॉट्सअॅपवर एखादा फोटो शेअर केल्यावर त्याची क्वालिटी डाऊन होते. आणि तो फोटो आहे तसा शेअर होत नसल्याची तक्रार अनेक यूजर्सने केली आहे. यूजर्सच्या याच तक्रारीची दखल घेत कंपनीने 'बेस्ट क्वालिटी'मध्ये फोटो पाठवण्याचा ऑप्शन आणला आहे.
व्हॉट्सअॅप यूजर्सना अलीकडे कम्युनिटी आणि इन-चॅट वोटिंगसह अनेक नवीन फिचर्स जोडले गेले आहेत. तसेच, आता 1,024 पर्यंत यूजर्स एका ग्रूपमध्ये सामील होऊ शकतात आणि 32 यूजर्स ग्रुप व्हिडीओ कॉल करू शकतात. याचबरोबर आता बऱ्याच प्रतिक्षेनंतर यूजर्सना फोटो अपलोड क्वालिटी बदलण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. म्हणजेच, तुमचे फोटो कोणत्या क्वालिटी पाठवायचे हे तुम्ही स्वत: निवडू शकता.
मेटा-मालकीच्या अॅपने यूजर्सना सेटिंग्जमध्ये एक सेव्ह फोटो अपलोड क्वालिटी विभाग दिला आहे. येथे यूजर्स त्यांच्या मित्रांना आणि संपर्कातील व्यक्तींना 'High Quality' फोटो पाठवायचे आहेत की नाही हे निवडू शकता. इथे दुसरा पर्याय 'डेटा सेव्हर' नावाने दिला आहे. जे डेटा सेव्हर निवडतात त्यांचे फोटो संकुचित केले जातील आणि अॅप चॅटिंग दरम्यान जास्त डेटा वापरणार नाही.
तिसरा पर्याय 'ऑटो' आहे, म्हणजेच नेटवर्कच्या गुणवत्तेनुसार, फोटो उत्तम दर्जात पाठवायचा की नाही हे अॅप स्वतः ठरवेल. मात्र, 'बेस्ट क्वालिटी'मध्ये पाठवलेल्या फोटोंचा आकार अधिक असेल आणि ते अपलोड किंवा डाऊनलोड करण्यासही जास्त वेळ लागेल. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे पर्याय निवडायचे आहेत.
'या' स्टेप्स फॉलो करा
1. व्हॉट्सअॅप उघडल्यानंतर, तीन डॉट्सवर टॅप करा आणि सेटिंग्जवर जा.
2. येथे तुम्हाला 'स्टोरेज आणि डेटा' वर टॅप करावे लागेल आणि स्क्रीनच्या तळाशी 'फोटो अपलोड क्वालिटी' पर्याय दिसेल.
3. फोटो अपलोड गुणवत्ता विभागात जाऊन, तुम्हाला 'बेस्ट क्वालिटी' निवडावी लागेल.डीफॉल्टनुसार हे सेटिंग स्वयं (शिफारस केलेले) वर सेट केले आहे.
जर तुमच्यासाठी मोबाईल डेटा किंवा इंटरनेट स्पीड ही समस्या नसेल तर उत्तम दर्जाची निवड करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
महत्वाच्या बातम्या :