लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे.
सध्या व्हॉट्सअॅपकडून या फीचरची चाचणी सुरु आहे. अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर ते तपासलं जात आहे.
फेसबुकच्या मालकीचं असलेलं व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर आणणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
दुसरीकडे फेसबुकने यापूर्वीच ग्रुप व्हिडीओ कॉलिंगचं फीचर दिलं आहे. यावरुन पूर्वीपासूनच ग्रुप कॉलिंग करता येतं.
फेसबुकवरुन ग्रुप व्हिडीओ कॉलिंग कसं करायचं?
- फेसबुकवरुन ग्रुप व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी तुमच्याकडे फेसबुक मेसेंजर असणं आवश्यक आहे
- मेसेंजरवर खालच्या बाजूला होम- फोन –कॅमेरा असे पर्याय दिसतील, त्यातील फोन कॉलिंगचा आयकॉन निवडा
- त्यानंतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात Start Group Call असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
- तुम्हाला तुमची फ्रेन्डलिस्ट दिसेल, त्यातील मित्र निवडा आणि वर उजव्या कोपऱ्यात ऑडिओ आणि व्हिडीओ असे आयकॉन दिसतील, त्यातील व्हिडीओ आयकॉनवर क्लिक करा. तुमचं व्हिडीओ कॉलिंग सुरु होईल.