मात्र हे फीचर तूर्तास विंडोज फोनवरच उपलब्ध आहे. सध्या v2.16.260 या बिटा व्हर्जनवर हे फीचर उपलब्ध करण्यात आलं आहे.
व्हिडीओ कॉल कसा करायचा?
व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला केवळ कॉलिंग बटणवर जाऊन व्हॉईस आणि व्हिडीओ 'Voice'/ 'Video' या पैकी एक पर्याय निवडायचा आहे.
याशिवाय तुम्हाला फ्रंट कॅमेरा किंवा रिअर कॅमेराचा पर्यायही निवडता येणार आहे.
इतकंच नाही तर तुम्हाला मिस्ड कॉलचं नोटिफिकेशनही येईल. त्यावर टॅप करुन तुम्ही कॉल बॅक करु शकता.
अँड्रॉईडवर व्हिडीओ कॉलिंग कधी?
सध्या हे फीचर विंडोज फोनवरच उपलब्ध आहे. मात्र ते अँड्रॉईड आणि iOS वर कधी उपलब्ध होणार याबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र विंडोजवर हे फीचर आल्यामुळे अँड्रॉईड आणि iOS वरही लवकरच हे फीचर उपलब्ध होईल, असं सांगण्यात येत आहे.