भोपाळ : देशविरोधी मजकूर असलेला मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट झाल्याने ग्रुप अॅडमिनला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. मध्य प्रदेशात 21 वर्षांचा तरुण गेल्या पाच महिन्यांपासून जेलमध्ये आहे. विशेष म्हणजे इतर अॅडमिननी ग्रुप सोडल्यामुळे हा यूझर संबंधित ग्रुपचा अॅडमिन झाला होता.
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मेंबरने 14 फेब्रुवारीला देशविरोधी मेसेज ग्रुपमध्ये पोस्ट केला. ग्रुपमधील काही सदस्यांनी या मेसेजला कडकडून विरोध करत पोलिस तक्रार दाखल केली. त्यानुसार तत्कालीन ग्रुप अॅडमिन राजा गुर्जरला पोलिसांनी समन्स बजावला.
चाईल्ड पॉर्न व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर, अॅडमिनला अटक
त्यानंतर राजाने लगेचच व्हॉट्सअॅप ग्रुप 'लेफ्ट' केला. मेंबरशिपच्या क्रमवारीनुसार आणखी दोघे जण ग्रुप अॅडमिन झाले. मात्र या कालावधीत त्यांनीही ग्रुप सोडला. अखेर जुनैद मेव त्या ग्रुपचा अॅडमिन झाला.
मेसेज पोस्ट करणारा सदस्य आणि जुनैद या दोघांविरोधात पोलिसांनी कलम 124अ (देशद्रोह) आणि 295अ (हेतूपुरस्सर एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
देशद्रोहाचा गुन्हा असल्यामुळे हायकोर्टाकडूनही जुनैदला जामीन मिळू शकत नसल्याचं त्याच्या भावाने सांगितलं.
देशविरोधी मेसेजमुळे डिफॉल्ट व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला कारावास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 11:54 AM (IST)
एका मेंबरने देशविरोधी मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे मध्य प्रदेशात 21 वर्षांच्या अॅडमिनला गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -