व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड बीटा अॅपमध्ये व्हिडीओ एडिटिंग फीचर
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 04:26 PM (IST)
मुंबई : व्हॉट्सअॅप अँड्रॉईडच्या लेटेस्ट बीटा अॅपमध्ये काही नवीन फीचर्स अॅड केले आहेत. यामध्ये फोटोंवर टेक्स्ट अॅड करण्यासोबत फ्रंट फ्लॅशचाही समावेश आहे. आता व्हॉट्सअॅप बीटा अॅपच्या माध्यमातून व्हिडीओ एडिटिंग या नव्या फीचरचाही समावेश केला जाणार आहे. व्हॉट्सअॅप अँड्रॉईड बीटा अॅपच्या 2.16.270 व्हर्जनमध्ये व्हिडीओमध्ये इमोजी, टेक्स्ट आणि एडिटिंग बटन उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे हे फीचर व्हॉट्सअॅपच्या कॅमेरा अॅपमध्येही काम करणार आहे. जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप कॅमेऱ्यामधून एखादा व्हिडीओ शूट कराल, तेव्हा एक एडिटिंग टूलही दिसेल. त्यानंतर स्क्रीनवरील पेन्सिल आणि 'T' बटनाच्या मदतीने व्हॉट्सअॅप यूझर्स व्हिडीओवर टाईप करु शकतात आणि एडिटिंग करु शकतात. व्हॉट्सअॅपचे हे नवे फीचर्स सर्वात आधी बीटा व्हर्जनवर उपलब्ध होतील. यांच्या वापरासाठी व्हॉट्सअॅपच्या गूगल प्ले बीटा टेस्टिंग प्रोग्रामसाठी रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर स्टोअरमधून लेटेस्ट बिल्ड डाऊनलोड करावं लागेल.