सियोल (दक्षिण कोरिया): सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या रिकॉलनंतर कंपनी आता ग्राहकांची जाहिरातीद्वारे माफी मागणार आहे. ग्राहकांना झालेल्या त्रासामुळे सॅमसंग जाहिरातीद्वारे दिलगिरी व्यक्त करणार आहे. योनहाप या वृत्तसंस्थेने सॅमसंगच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.




सॅमसंग लवकरच एक जाहिरात प्रकाशित करणार आहे. ज्यामध्ये बॅटरी स्फोटाच्या घटना आणि ग्राहकांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येईल. गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरीचा चार्जिंग करताना स्फोट होत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर कंपनीने 2 सप्टेंबरला सर्व फोन परत मागवले आहेत.



गॅलक्सी नोट 7 च्या नव्या अपडेटमध्ये बॅटरीला पूर्ण क्षमतेने चार्ज होण्यापासून रोखण्यात येणार आहे. त्यामुळे बॅटरी पूर्ण क्षमतेच्या 60 टक्के कमी वेगाने चार्ज होईल, असंही सॅमसंगच्या वतीने सांगण्यात आलं आहे.