चुकीने एखादा मेसेज सेंड झाल्यास तो डिलीट करता यावा, यासाठी हे फीचर देण्यात आलं होतं. चुकीच्या व्यक्तीला मेसेज गेल्यानंतर सात मिनिटांच्या आत तो डिलीट करता येतो. अशा मेसेजच्या जागी डिलीटेड मेसेज असं दिसतं.
या फीचरबाबत समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, तुम्ही डिलीट केलेला मेसेजही वाचला जाऊ शकतो. याचा सर्वात मोठा धोका ग्रुपमध्ये आहे. तुम्ही मेसेज डिलीट करण्यापूर्वी एखाद्या युझरने त्याला कोट करुन रिप्लाय दिलेला असेल तर तो दिसत राहिल.