मुंबई: व्होडाफोननं रमजानच्या महिन्यात एका नव्या पोस्टपेड प्लानची घोषणा केली आहे. या प्लानची किंमत 786 रुपये आहे. या प्लानमध्ये कंपनीनं 25 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग दिलं आहे.
हा प्लान कंपनीनं आसाम आणि ईशान्य भारतासाठी आणला आहे. टेलीकॉम ब्लॉगर संजय बाफना यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच व्होडाफोननं एक दुसरा प्लान आणला आहे. अवघ्या 5 रुपयाच्या हा प्लान होता. यामध्ये व्होडाफोनचे 2जी यूजर्स फक्त 5 रुपयात अनलिमिटेड डेटा मिळवू शकतात. यासाठी यूजर्सला *444*5# हा नंबर डायल करायचा आहे.
याशिवाय अनलिमिटेड लोकल एसटीडी कॉलिंग आणि 2जी डेटासाठी कंपनीनं 253 रुपयांच्या प्लानही बाजारात आणला आहे. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे.